सध्या लॉकडाउनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणारे चित्रपट जास्त अडचणीत येताना दिसत आहेत.दरम्यान नेटफ्लिक्सला असाच सोशल मीडियाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.’नवरस’ ही सिरीज शुक्रवारी ६ ऑगस्टला प्रदर्शित झाली, आणि लगेच ट्वीटरवर #bannetflix असा ट्रेंड सुरू झाला. नेटफ्लिक्सने आपल्या या सीरिजमधील एका कथेसाठी तामिळ वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून हा वाद पेटला आहे. यावरुन मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना आहे.
मणिरत्नम यांची नवरस ही सिरीज ६ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.सर्वप्रथम रझा अकादमीने, एका तामिळ वृत्तपत्र असलेल्या डेली Thanthi मध्ये नेटफ्लिक्सच्या या सिरीजमधील एका कथेच्या जाहिरातीसाठी कुराणमधील आयत वापरल्याबद्दल ओटीटी प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं.नेटिझन्सने देखील या जाहिरातीवरून मायक्रो ब्लॉगिंग साईटवर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली.
अनेकांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “चित्रपटांमध्ये सतत इस्लामला लक्ष्य केलं जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वारंवार भावनांशी खेळ केला जात आहे. हा प्लॅटफॉर्म सतत विविध समाजातील लोकांच्या भावना दुखावत आहेत”. या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेता पुन्हा एकदा चित्रपटामुळे वातावरण पेटण्याची शक्यता आहे. ज्या कथेच्या जाहिरातींवरून हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे ती ‘इनमाई’ ही कथा माणसांमधील भीतीच्या भावनेवर भाष्य करते. तामिळ भाषेत असलेल्या या कथेमध्ये सिद्धार्थ आणि पार्वती मुख्य भूमिकेत आहेत. तर विजय सेतुपति, सुरिया, अरविंद स्वामी, नागा शौर्य, रेवती यासारखे अनेक प्रसिद्ध कलाकार देखील दिसणार आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com