टोक्यो ऑल्मिपिक भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचला.जगभरातून त्याच कौतुक होतंय. बॅालीवूड बरोबरच मराठी कलाकारांनी सुद्धा नीरजचं कौतुक केलं.लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी नीरजचं कौतुक केल आहे.
नीरजच्या यशानंतर प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातील शाळांमधून खेळाडू घडवण्याची गरज असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रशांत दामले यांनी जवळचे कवी मित्र असलेल्या अमेय वैशपायन यांनी नीरजच्या यशानंतर लिहिलेली खास कविता शेअऱ केलीय.
यासोबच प्रशांत दामले यांनी एक कमेंट करत खेळाडूंना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील आंतर शालेय स्पर्धेत पहिल्या आलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं आणि त्यांच्या शाळेच्या अंतिम परीक्षेत त्यांना त्यासाठी किमान 15 गुण द्यायला हवेत. तर त्यांचे पालक पण आनंदी आणी आश्वस्त राहतील”. असं ते म्हणाले.
शालेय पातळीवर क्रीडास्पर्धा किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देणं तसचं त्यांना पाठबळ देणं गरजेचं असल्याचं अनेक नेटकरी म्हणाले आहेत.
The post “….आमचेही जन गण मन आज जगी गाजले”. appeared first on Lokshahi News.
Credits and Copyrights – lokshahinews.com