दहीहंडी अथवा मंदिरे उघडण्याकरिता आंदोलन करून जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलन उभे करावे, असाही टोला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व मनसेला नाव न घेता लगावला होता. यावरून आता मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही कोरोना संपवण्याकरिता आंदोलनदेखील करत आहोत, परंतु वसुली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ आहे का? असा प्रश्न करत एकाला ईडीची नोटीस आली की लावा लाॅकडाऊन. हे आता अजिबात चालणार नाही, असा इशारा राजू पाटील यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
लसीकरण केंद्रे उभारायची आहेत, त्याला मुभा द्या
राजू पाटील यांनी कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यांवरून कल्याण-डोंबिवली पालिकेवरसुद्धा निशाणा साधला आहे. “दुसरी लाट आली त्यावेळी लसीकरणाकरिता केंद्र उभारण्यास सुरुवात केली. पालिकेकडे गेलो, आयुक्तांना भेटलो. त्यांना सांगितले, आम्हाला ४-५ लसीकरण केंद्रे उभारायची आहेत, त्याला मुभा द्या, तुमच्या लसी येतील, त्या लोकांना मोफत टोचून देऊ, पालिकेचासुद्धा खर्च होणार नाही, मात्र त्याच्याकडेदेखील दुर्लक्ष केले. त्यानंतर १६ जानेवारीला जो लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानंतर पालिकेने अडीच ते पावणेतीन लाख डोस दिले आहेत. रोजची सरासरी काढली, तर १५०० आहे. एवढ्या संथगतीने लसीकरण होणार असेल, तर पूर्ण केडीएमसीचे लसीकरण व्हायला किमान दोन वर्षे लागतील”, असे राजू पाटील म्हणाले.
आंदोलन करून जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलन उभे करावे
हिंदुत्वविरोधी अथवा हिंदूंच्या सणांच्या विरोधी असणारे सरकार अशी टीका करणाऱ्यांना मी सांगेन की, केंद्रामार्फतसुद्धा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनीदेखील दहीहंडी अथवा गणेशोत्सवाच्या काळात सतर्कता बाळगा, असे पत्र राज्य शासनाला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार हे हिंदुत्वविरोधी अथवा हिंदूंच्या सणांच्या विरोधी असणारे सरकार नसल्याची स्पष्टोक्ती मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच दहीहंडी अथवा मंदिरे उघडण्याकरिता आंदोलन करून जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलन उभे करावे, असा टोलाही विरोधकांना लगावला.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.