सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील कोटकामते हायस्कूलचे शिक्षक व विद्यमान टेंबवली ग्रामपंचायत सदस्य गोविंद सहदेव सारंग (५०) रा टेंबवली कालवी हे नांदगाव वरून देवगडच्या दिशेने येत असताना तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालय नजीक त्यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात गोविंद सारंग जागीच ठार झाले असून सदरची घटना बुधवारी रात्री १०.१५ वा सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोविंद सारंग हे आपल्या ताब्यातील वॅगनार कार (क्र एम. एच ०७ क्यू ४४७४) ने मुलगी यशश्री हिच्यासोबत आपल्या टेंबवली कालवी येथील घरी येत असताना तळेबाजार भवानी मंगल कार्यालय नजीक गाडीवरील ताबा सुटला. रस्त्यालगत असलेल्या कठड्याला आपटुन गाडी पलटी झाली. त्यात त्यांना गभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी यशश्री हिला देखील गंभीर दुखापत झाल्याने तिला अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, वाहतूक पोलीस मिलिंद परब, अमित हळदणकर, दशरथ चव्हाण, प्रशांत जाधव आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.