
मुंबई : राज्याच्या विविध भागांत नुकत्याच आलेल्या पुरातील आपत्तीग्रस्तांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेचे सर्व मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पुरातील आपत्तीग्रस्तांसाठी शिवसेनेचे मंत्री व आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पक्षनेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी कळवले आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com