सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी सर्वांची लगबग सुरु आहे. आकर्षक सजावट करण्याकरिता खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. नाशिक शहरातील सर्वांत पहिले nashikonweb.com ‘‘ पोर्टल यंदा ‘ऑनलाइन गणेशोत्सव‘ ही संकल्पना राबवत आहे. आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती ‘nashikonweb.com च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.online Ganeshotsav
जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. याच प्रयत्नांना ‘nashikonweb.com न्यूज‘ बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा ‘nashikonweb.com न्यूज‘च्या माध्यमातून संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.
आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो,व्हीडियो , माहितीचा बाइट आपले नाव आणि पत्यासह nashikonweb.com या आमच्या प्रसिद्ध मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. बाप्पाचे फोटो nashikonweb.news@gmail.com या मेलवर पाठवावेत.online Ganeshotsav
Credits and copyrights – nashikonweb.com