स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo एक नवीन 5G स्मार्टफोन आणणार आहे. नवीन 5G स्मार्टफोन Oppo Reno8 5G 18 जुलै रोजी भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे.

Oppo Reno8 5G फोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्ट, 80W SupervoocTM चार्जिंग सपोर्ट, MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि AMOLED डिस्प्ले आहे. फोनची किंमत 30,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया फोनच्या फीचर्सची सविस्तर माहिती.
Oppo Reno8 5G फोन वैशिष्ट्ये
Oppo Reno8 5G फोनमध्ये 180 Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.43-इंच फुल HD+ AMOLED पंच होल डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 1080 पिक्सेल बाय 2400 पिक्सेल आणि 409ppi पिक्सेल घनता आहे. याच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. डिस्प्लेमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 4,500mAh बॅटरी आहे, 80W SUPERVOOCTM चार्जिंगला सपोर्ट करेल.
फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हे कॅमेरे 50-मेगापिक्सलचे प्राथमिक सेन्सर, 02-मेगापिक्सलचे वाइड-एंगल सेन्सर आणि 02-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहेत. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील आहे.
कार्यक्षमतेसाठी यात MediaTek Dimensity 1300 Octa-core प्रोसेसर आहे. हा फोन 08GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह येणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल सिम, वाय-फाय, 5जी, 4जी नेटवर्क, ब्लूटूथ v5.3 व्हर्जन, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप सी पोर्ट आहे.