नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी येत्या 6 जानेवारी 2023 रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा जनसुनावणीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सकाळी 11 वाजेपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या उपस्थित राहून महिलांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत.
महिलांना थेट लेखी निवेदनाद्वारे यामध्ये सहभागी घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात दि. 6 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनमध्ये हा महिला जनसुनावनीचा कार्यक्रम होणार आहे. या सुनावणीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित रहाणार आहेत. या सुनावणीत तक्रारदार पिडित महिला स्थानिक पातळीवर कोणतीही पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडणार आहेत.
Copyrights & Credits – nationnewsmarathi.com