नेशन न्युज मराठी टीम.
पुणे – अनाथांसाठी सेवाकार्य करत आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात गालेक्सी हॉस्पिटल मध्ये आज निधन झाले. त्या ७३ वर्षाच्या होत्या. सिंधुताई यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय या जगाचा निरोप घेऊन गेली. हजारो बालके आज पोरकी झाली आहेत.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोहेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्हातील नवरगाव या ठिकाणी झाला होता.अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत. हजारो अनाथ बालकांचे संगोपन त्यांनी केले.सिंधुताई सपकाळ यांनी सहा संस्था स्थापन केल्या आहेत.सिंधुताईना राष्ट्रीय आतरराष्ट्रीय असे साडे सातशे पुरस्कार मिळाले आहे. गेल्या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हजारो अनाथ मुलांच्या मायमाऊलीला नेशन न्युज मराठी टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली