काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडने (New Zealand) माघार घेतल्यानंतर आता इंग्लंडनेही (England) सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे (England) पुरुष व महिला (Men and women) असे दोन्ही संघ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये (Pakistan) मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते, परंतु काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडने माघार घेतल्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडूनही ( England Cricket Board) लवकरच पाकिस्तान दौऱ्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. सोमवारी त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडने सामन्यात खेळण्यास का नकार दिला
पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या काही तासआधी न्यूझीलंडने खेळण्यास नकार दिला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व खेळाडू चांगलेच संतापले आहेत. न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा शेवटच्या क्षणी रद्द झाल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी इंग्लंडनेदेखील पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की , ‘पाश्चात्य गट एकवटला आहे असे दिसते. आमच्या संघाचे मुख्य लक्ष्य आता ३ संघांना पराभूत करणे हे आहे.’ राजा म्हणाला , ‘यापूर्वी आमचा शेजारी भारत (India) हा एक संघ आमच्या निशाण्यावर होता. आता यामध्ये न्यूझीलंड व इंग्लंड (New Zealand and England) हे दोन संघ जोडले गेले आहेत.’
जर मी PCB प्रमुख असतो तर…
राजा यांनी एक ट्विटही केले. त्यात ते म्हणतात, ”आम्ही इंग्लंडच्या या निर्णयामुळे निराश आहोत. त्यांनी महत्त्वाच्या वेळी दिलेल्या वचनाचे पालन केले नाही. यामधून आपण नक्कीच बाहेर पडू. पाकिस्तान क्रिकेट जगामधील सर्वोत्तम संघ होण्याकरिता हा एक वेक-अप कॉल आहे. जेणेकरून उर्वरित संघ कोणतेही निमित्त न करता आमच्यासोबत खेळण्याकरिता रांगा लावतील.” पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) भडकला आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे समजून घेतले पाहिजे की, कोणीही त्यांच्या बाजूने भूमिका घेणार नाही व त्यांना स्वतःची भूमिका घ्यावी लागेल.
पुढील काळात इंग्लंड व न्यूझीलंड दौऱ्यावर गेलो नसतो
अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, “आमच्या संपूर्ण देशाची प्रतिमा तुम्ही खराब करत आहात. तुम्हाला हे दाखवायचे आहे की, आमचे सैन्य व बुद्धिमत्ता तुमचे संरक्षण करू शकत नाही. जर मी PCB प्रमुख असतो, तर मी पुढील काळात इंग्लंड व न्यूझीलंड दौऱ्यावर गेलो नसतो व फक्त सुरक्षा धोक्यांचा हवाला दिला असता. अख्तरने म्हटले आहे, “टी-२० विश्वचषकामधील पाकिस्तानचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध आहे, परंतु २६ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध मोठा सामना होईल. न्यूझीलंडला हरविण्याकरिता संपूर्ण संघाने एकत्र काम केले पाहिजे. पहिल्यांदा पीसीबीने आपली निवड निश्चित करावी. तसेच संघातील त्या ३-४ मुलांना स्थान द्यावे जे बाहेर आहेत. राग व्यक्त करण्याची ही वेळ असेल, पाकिस्तान (Pakistan) संघाला आता हेच करावे लागेल, तर पाकिस्तानने यापेक्षा खूप वाईट काळ पहिले आहेत, आम्ही पुन्हा येऊ. विश्वचषक जिंकून आम्ही याचा बदला घेऊ.”
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.