स्रोत: रत्नागिरी खबरदार
परमबीर सिंह यांना भाजपने पळवून लावल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधून वारंवार करण्यात येत आहेत. या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. परमबीर सिंह यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव आहे, असा आरोप भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब असतील, पळुन गेले असतील तर गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून गेला कसा? याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मंत्री मलिक यांना दिलं आहे. परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे.
परमबीर सिंग पळून गेला मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना? रेशनकार्ड, आधार कार्ड हे इथलेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करीत आहे, असं ते म्हणाले. ते पळून गेले असतील तर ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय. परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. ते जर सापडले तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल, त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, हा एक डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.