पुणे : साखर कारखान्याबाबत वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करूनही काही निष्पन्न झालेले नाही. 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा आरोप खोटा आहे. साखर कारखान्यांबाबतीत खोटी आकडेवारी सादर करून आरोप केले जात असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले. अजित पवार पुढे म्हणाले, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा असून वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही उपयोग नाही.

तसेच सध्या खोटी आकडेवारी दाखवून आरोप केले जात आहेत. एनसीबी प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव घेतलं जातं आहे यावर बोलताना पवार म्हणले, नियम कायदा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल. मागील काही कळत मोठमोठ्या व्यक्तीचे नाव घेण्याचे प्रकार सुरू झाले, असे त्यांनी म्हटले आहे.