नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी 15 ऑगस्ट पासून शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल संकल्पना सुरू केल्याने 70 टक्के लोक हेल्मेट वापराबाबद्दलचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहे. दुचाकीस्वरांचे प्राण वाचवणे ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असल्याचं सांगत पोलीस आयुक्त पांडेय यांनी आजपासून उर्वरित 30 टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे यासाठी आग्रह धरला आहे.
त्यानुसार आजपासून विना हेल्मेट दुचाकी चालवणे आता वाहनधारकांसाठी काहीसे अवघड होणार आहे. शहरात अनेक ठिकाणी नाका बंदी करत विना हेल्मेट दुचाकी धारकांवर आगळीवेगळी कारवाई पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे.
विना हेल्मेट दुचाकी चालवनाऱ्यांचे वाहन आता पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली असून त्याना मुंबई नाका येथील येथे 2 तास समुपदेशसाठी वेळ द्यावा लागणार आहे.हेल्मेट वापराचे समुपदेशन झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहन धारकांचे वाहन पोलीस त्यांना परत करणार असल्याची आगळीवेगळी कारवाई शहरात सुरू झाली आहे.
सप्टेंबर 21 पर्यंत शहरात 100 टक्के हेल्मेट वापराचा परिणाम दिसून येण्यासाठी तसेच अपघाताचे प्रमाण कमी होऊन मृत्युदर 0 करणे हाच पोलिसांचा प्रयत्न असल्याचं पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले आहे. त्यासाठी शहरात फिरते पथक तैनात करण्यात आले आहे.
एखाद्या वाहन धारकाने पोलिसांशी वाद घातल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार असली तरी पोलिसांशी वाद न घालता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट वापरल्यास संभाव्य कारवाई टळणार आहे. सुज्ञ नाशिककर या उपक्रमाला साथ देऊन यशस्वी करतील अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Credits and copyrights – nashikonweb.com