Huawei कंपनीने आपले दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. कंपनीने आपल्या ‘पी50 सीरीज’ मध्ये Huawei P50 आणि Huawei P50 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत.
Huawei P50 Pro चे स्पेसिफिकेशन्स
हुवावे पी50 प्रो मध्ये कंपनीने 1228 x 2700 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे. ही एक कर्व्ड स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते. या फोनमध्ये ओएलईडी डिस्प्ले असल्यामुळे यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Huawei P50 Pro कंपनीच्या HarmonyOS 2 आणि दोन वेगवेगळ्या प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. हुवावे पी50 प्रो चा एक मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर चालतो तर दुसरा मॉडेल हुवावेच्या हायसिलिकॉन किरीन 9000 चिपसेटला सपोर्ट करतो. या हुवावे फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यांतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनमध्ये 256GB पर्यंतच्या नॅनो मेमरी कार्डचा वापर करता येतो.
Huawei P50 Pro मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे, त्याला 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स, 40 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आणि 13 मेगापिक्सलच्या वाईड अँगल लेन्सची जोड देण्यात आली आहे. हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या हुवावे फोनमध्ये 4,360एमएएचची बॅटरी आहे जी 66W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.