बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत आणि प्रार्थना बेहरे यांनी एकत्र मिळून एक गाणं रिलीज केलंय. नादखुळा म्युझिक लेबल प्रोडक्शन्सने ‘आपली यारी’ हे गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रदर्शित केला आहे.
आपली यारी गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं स्वरबद्ध केलंय. या गाण्यात दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. तन्मय पाटेकर,प्रतिभा जोशी,बॉब हातनोलकर,कोमल खरात,रितेश कांबळे,तृप्ती राणे,निक शिंदे,श्रद्धा पवार,तृप्ती राणे, प्रथमेश देवळेकर हे दहा जणं या गाण्यात झळकताना दिसतायत.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणाली “#फ्रेंडशिप डे# च्या निम्मिताने नाद्खुळा या निखीलच्या म्युझिक लेबलवर हे गाण लॉंच करायची संधी मिळाली. याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. त्यामुळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचं गाणं करावं, हा दुग्धशर्करा योग आहे.”
निर्माता निखील नमीत म्हणतात,”आपली यारी या गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे”. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमुळे या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com