अक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकर रा. बिबवेवाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, भावेश कांबळे या गुन्हेगाराचा मागील वर्षी खून झाला होता. त्याचा साथीदार अक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकर हा भावेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १० ते १५ जणांसोबत केक घेऊन आला असून, त्याच्या हातामध्ये पिस्तूल आहे व ते सर्वजण नाचत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.
त्यानुसार संबधित आरोपीला नवनाथ दत्त मंदिराजवळून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या जवळ असलेली पिस्तूल ताब्यात घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com