भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून, त्यांचे लक्ष्य दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या T-20 विश्वचषकावर आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेकरिता भारतसुद्धा आपली दमदार टीम तयार करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यावर सर्वांची नजर असून, तो गोलंदाजी करणार का? याकडेसुद्धा त्यांचे लक्ष असेल. या काळात भारताच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी हार्दिक पुढील महिन्यामध्ये चालू होणाऱ्या आयपीएलसोबत T-20 विश्वचषकातदेखील गोलंदाजी करेल, असा विश्वास वर्तवला आहे.
हार्दिक लवकरच गोलंदाजीकरिता परतणार
श्रीलंका दौऱ्यावरून परतल्यानंतर हार्दिक नॅशनल क्रिकेट अकॅडमीत इतर खेळाडूंसह सराव व फिटनेस टेस्टमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्याच्यावर लक्ष ठेवून असलेले गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हाम्ब्रे यांनी, हार्दिक लवकरात लवकरच नियमित गोलंदाजी करायला चालू करेल, असाही विश्वास दर्शवला आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हाम्ब्रे म्हणाले की, “हार्दिकच्या सराव व गोलंदाजीवर आम्ही काम करत आहोत, परंतु त्याच्यावर आम्ही कोणताच दबाव टाकत नसलो तरीही लक्ष ठेवून आहोत. पुढील विश्वचषकाकरिता आम्ही त्याला गोलंदाजीकरिता पुन्हा तयार करत आहोत.”
कर्णधार कोहलीनेही हार्दिकच्या गोलंदाजीची गरज अनेकदा दर्शवली
हार्दिक पंड्या मागील बराच काळ गोलंदाजीपासून दूर असला, तरीही नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याने काही ओव्हर गोलंदाजी केली. वनडे आणि T-20 अशा दोन्ही सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी केली होती, परंतु पाठीच्या दुखापतीमुळे त्याला हवी तशी गोलंदाजी करता आली नाही. यापूर्वी मागील वर्ष अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयपीएलमध्येही काही ओव्हर गोलंदाजी केली होती, मात्र फिटनेसच्या त्रासामुळे त्याला गोलंदाजी हवी तशी करता आली नव्हती. या काळात कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा हार्दिकच्या गोलंदाजीची गरज अनेकदा दर्शवली असून, आता T-20 विश्वचषकात तरी हार्दिक पंड्या गोलंदाजी करतो का? हेदेखील पाहावे लागेल.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.