मुंबईतील गरवारे क्लब येथे तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक व आमदार श्रीकांत भारतीय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनाथ मुलांना मोबाईल आणि टॅबचे वाटप करण्यात आले. या वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे नूतन अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि स्वामी ब्रिजमोहन दास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
– जाहिरात –
महाराष्ट्रातील अनाथ मुलांना तर्पण परिवाराचे छत्र लाभल्याने या दुर्दैवी मुलांचे नशीब उजळले आहे. आपल्या लोकशाही देशात सर्वांना समान संधी मिळायला हवी. त्यासाठी सरकारी यंत्रणा निर्माण झाली. सरकारचे काम तर्पण फाउंडेशन सारख्या संस्था करत आहे. आगामी काळात महाराष्ट्र शासन या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन अॅड.राहुल नार्वेकर यांनी केले.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, तर्पण फाऊंडेशनने मुंबई शहरातील अनाथ मुलांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्यास या चांगल्या कामासाठी मुंबई पोलीस दल पुढे येईल. तर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोबाईल व टॅब फोन वितरण समारंभात ते बोलत होते.
– जाहिरात –
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनाथाश्रमातील अनाथ मुला-मुलींच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न समोर आला तेव्हा या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी तर्पण फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत तर्पणच्या वतीने 152 अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे सामाजिक व शैक्षणिक पुनर्वसन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत बसू इच्छिणाऱ्या अनाथ मुलांसाठी तर्पण फेलोशिप सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर्पणचे संचालक संतोष मानूरकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती उमा चव्हाण यांनी केले.
Credits And Copyrights : – breakingboom.com
This News has been generated from feed. If you have any problems with post, Please contact us.