गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी मात्र गणेशोत्सवात गावी जाण्यास पाठ फिरवली होती. यंदा मात्र हे चित्र उलट असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी तिकीट बुकिंग करण्यास सुरुवातही केली असून, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण चक्क फुल्ल झाले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांमध्ये नेहमीच उत्साहाचे वातावरण असते. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचे विभाजन करण्याकरिता मध्य रेल्वेवर ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. गणेशोत्सव २०२१ साठी यापूर्वी ७२ उत्सव विशेष ट्रेन चालविण्याचे नियोजन आहे.
मुंबई ते सावंतवाडी रोड दोन फेऱ्या
मुंबई ते सावंतवाडी रोड विशेष ट्रेन क्रमांक ०१२३५ दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्थानकावरून १३.१० वाजता सुटेल ते सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहचणार आहे. विशेष ट्रेन क्रमांक ०१२३६ दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकावरून ०२.३० वाजता सुटेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी १४.०० वाजता पोहचणार आहे. ही विशेष ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
पनवेल-सावंतवाडी रोड चार फेऱ्या
पनवेल-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन क्रमांक ०१२३७ दिनांक ८ सप्टेंबर २०२१ व ९ सप्टेंबर २०२१ रोजी पनवेल या रेल्वे स्थानकावरून १४.१० वाजता सुटेल ते सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहचणार आहे. विशेष ट्रेन क्रमांक ०१२३८ दिनांक ८ सप्टेंबर २०२१ व ९ सप्टेंबर२०२१ रोजी सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकावरून ०२.३० वाजता सुटेल ते पनवेल या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल. ही विशेष ट्रेन रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबेल. संरचना ०१२३५/०१२३६ आणि ०१२३७/०१२३८ विशेष ट्रेनकरिता : १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव सहा फेऱ्या
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव विशेष ट्रेन क्रमांक ०१२३९ लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून दिनांक ५ सप्टेंबर २०२१, ७ सप्टेंबर २०२१ व ९ सप्टेंबर २०२१ रोजी ०५.३३ वाजता सुटेल ते मडगाव या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. विशेष ट्रेन क्रमांक ०१२४० मडगाव दिनांक ५ सप्टेंबर २०२१, ७.९.२०२१ व ९.९.२०२१ रोजी या रेल्वे स्थानकावरून २०.३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.३० पोहचणार आहे. ही विशेष लोकल ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी या स्थानकांवर थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ सहा फेऱ्या
लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ विशेष ट्रेन क्रमांक ०१२४१ लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून दिनांक ३ सप्टेंबर २०२१, ७ सप्टेंबर २०२१ व १० सप्टेंबर २०२१ रोजी ००.४५ वाजता सुटेल व कुडाळ या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. विशेष ट्रेन क्रमांक ०१२४२ कुडाळ या रेल्वे स्थानकावरून दिनांक ५ सप्टेंबर २०२१, ८ सप्टेंबर २०२१ व १२ सप्टेंबर २०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहचणार आहे. ही विशेष ट्रेन ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर थांबेल.
पनवेल ते कुडाळ सहा फेऱ्या
पनवेल-कुडाळ विशेष ट्रेन क्रमांक ०१२४३ पनवेल या रेल्वे स्थानकावरून दिनांक ४ सप्टेंबर २०२१, ८ सप्टेंबर २०२१ व ११ सप्टेंबर २०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल व कुडाळ या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी ११.२० वाजता पोहचणार आहे. विशेष ट्रेन क्रमांक ०१२४४ विशेष कुडाळ या रेल्वे स्थानकावरून दिनांक ३ सप्टेंबर २०२१, ७ सप्टेंबर २०२१ व १० सप्टेंबर २०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल व पनवेल या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी २३.१० वाजता पोहचणार आहे. ही विशेष ट्रेन रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर थांबेल.
पनवेल-कुडाळ चार फेऱ्या
पनवेल-कुडाळ विशेष ट्रेन क्रमांक ०१२४५ पनवेल या रेल्वे स्थानकावरून दिनांक ५ सप्टेंबर २०२१ आणि १२ सप्टेंबर २०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. ०१२४६ विशेष ट्रेन कुडाळ या रेल्वे स्थानकावरून दिनांक ४ सप्टेंबर २०२१ आणि ११ सप्टेंबर २०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल व पनवेल या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी २३.०० वाजता पोहचणार आहे. ही विशेष ट्रेन रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर थांबेल.
पुणे-मडगाव/करमळी दोन फेऱ्या
पुणे-मडगाव/करमळी- पुणे विशेष ट्रेन क्रमांक ०१२४७ दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी पुणे या रेल्वे स्थानकावरून १८.४५ वाजता सुटेल व मडगाव या रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहचणार आहे. विशेष ट्रेन क्रमांक ०१२४८ करमळी या रेल्वे स्थानकावरून दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी १५.१० वाजता सुटेल व पुणे या रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहचणार आहे. ही विशेष ट्रेन लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी या स्थानकांवर थांबेल.
पनवेल–करमळी दोन फेऱ्या
पनवेल-करमळी/मडगाव-पनवेल विशेष ट्रेन क्रमांक ०१२४९ पनवेल दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि करमळी या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी १४.१५ वाजता पोहचणार आहे. विशेष ट्रेन क्रमांक ०१२५० मडगाव या रेल्वे स्थानकावरून दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी ११.३० वाजता सुटेल व पनवेल या रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी २३.०० वाजता पोहोचेल. ही विशेष ट्रेन रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी या स्थानकांवर थांबेल. आधी घोषित केलेल्या गणेश उत्सव विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्यावर नमूद विशेष ट्रेन व्यतिरिक्त, आधीच जाहीर केलेल्या विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या (८) खालील प्रमाणे चालविण्यात येतील:
०१२२७ मुंबई-सावंतवाडी रोड विशेष दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी, ०१२२८ सावंतवाडी रोड-मुंबई विशेष दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी, ०१२२९ मुंबई- रत्नागिरी विशेष दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी, ०१२३० रत्नागिरी- मुंबई विशेष दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी, ०१२३४ रत्नागिरी- पनवेल विशेष दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी, ०१२३१ पनवेल- सावंतवाडी रोड विशेष दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी, ०१२३२ सावंतवाडी रोड -पनवेल विशेष दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी, ०१२३३ पनवेल- रत्नागिरी विशेष दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी, आरक्षण: वरील अतिरिक्त विशेष गाड्यांकरिता व आधीच घोषित केलेल्या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्याकरिता विशेष शुल्कासह बुकिंग दि. ७ ऑगस्ट २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. सविस्तर थांबे आणि वेळेकरिता कृपया www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या अथवा NTES अॅप डाऊनलोड करावे. या विशेष गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच चढताना, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानकावर कोविड १९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून प्रवासाची परवानगी असेल.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com