राज्यात पुन्हा एकदा पाऊस (Rain Updates) सक्रिय झाला असून, पुढील ५ दिवसांत पुन्हा एकदा विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासोबत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीहून १२% पाऊस जास्त आहे. त्यामध्ये मराठवाड्यात ३२% अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील काही जिल्हे व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे औरंगाबादसह परभणी, हिंगोली, नांदेड, बीड व लातूरमधील बरीच धरणं दुथडी भरून वाहत आहेत. काही भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे व सातारा येथे मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, परभणी या ठिकाणी अतिरिक्त, तर जालना येथे तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी
कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई उपनगरे येथे अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण व घाट परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांना IMD ने यलो अलर्ट (Yellow Alert) लागू केला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासोबत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सरासरीपेक्षा कमी पाऊस
सर्वाधिक पाऊस जालनामध्ये सरासरीपेक्षा ६९% जास्त आहे. सर्वात कमी पाऊस नंदूरबारमध्ये सरासरीहून १९ टक्क्यांनी कमी झाला. नंदूरबारमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला ही तूट ४३ टक्क्यांपर्यंत कमी होती. कोकणामध्ये एका जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदला गेलेला नाही. मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा ७% कमी पाऊस नोंदला गेला आहे. मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये सरासरीहून जास्त पाऊस नोंदला गेला आहे.
या विभागांत पावसाचा जोर वाढणार
आजपासून येत्या चार दिवसांत विदर्भामध्ये हळुहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र (Maharashtra), कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा (Western Maharashtra and Marathwada) या विभागांत पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये सोमवारपर्यंत तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गामध्ये रविवारी व सोमवारी तुरळक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, मुंबई येथे सोमवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर तोपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.