लॉकडाऊन (Lockdown) लावून सरकारचे बरे चालले आहे. मोर्चे नाहीत, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरे चाललेय सरकारचे, असे सांगताना सरकारला आता निवडणुका (Election) नको आहेत, असाही दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) तयारीकरिता मनसे सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या सर्व मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत. या महिन्यातील राज ठाकरे यांचा पुण्याचा हा आठवा दौरा आहे. राज यांनी येथील आठ विधानसभा मतदारसंघांतील (Assembly constituency) शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्यावर तुमचे मत काय? असा थेट प्रश्न राज यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.
सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता, कारण…
निवडणुका स्थगित (Election postponed) ठेवल्या पाहिजेत, परंतु काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. सरकारच्या (government) फायद्याचे असेल म्हणून आता निवडणुका (Election) घेतल्या जात नसतील. यामध्ये काही काळेबेरे असेल तर तेदेखील समजून घ्यायला पाहिजे. तर सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता. कारण नंतर सरकार महापालिका चालवणार. कारण त्यावर प्रशासक नेमणार व सरकारचे सगळे काम बघणार, तसेच हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असे नको, परंतु जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही, असेही राज म्हणाले. सरकारकडे (government) यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणले तर इम्पिरिकल डेटा अथवा जनगणना हे सर्व होऊ शकते. ती काही कठीण गोष्ट आहे असे वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे आता मंडळे ठरवणार
यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरदेखील मनसेची भूमिका स्पष्ट केली असून, सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मात्र सुरू आहेत, तिकडे गर्दी चालते. केवळ दहीहंडी व गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा व तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार आणि गणेशोत्सवाला नको ही कोणती पद्धत?, असा प्रश्न करताना गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे आता मंडळे ठरवतील. गणेशोत्सव मंडळांसोबत बोलून चर्चा करू, असे ते म्हणाले.
फक्त कोरोनाची भीती दाखवली जातेय
या लॉकडाऊनमुळे (Lockdown) जे चाललेय ते बरे चाललेय असे सर्व सरकारला वाटत आहे. आंदोलने नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही आणि रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा आणि आपली आपली दुकाने चालवा. बरे चालले आहे सरकारांचे. फक्त कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसर्या, चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सगळे करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा प्रश्नही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शाळा चालू करण्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलांचे लसीकरण झाले नाही. पुनावालांचेही स्टेटमेंट आहे, परंतु लसीकरण पूर्ण झाले नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावर शाळा उघडा, असेही ते म्हणाले.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.