मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. अशातच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वरही करोनाने एन्ट्री केली आहे. शिवतीर्थवरील एका सुरक्षा कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे राज ठाकरे पुढील १० दिवसांतील सर्व कार्यक्रम आणि नियोजित गाठीभेटी रद्द केल्या आहेत. तसेच शिवतीर्थवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचण्यांचे निकाल आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील निर्णय घेतला जाईल.