मुंबई : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रजनीताई पाटील (Rajni Patil) यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज विधिमंडळात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने रजनीताई पाटील या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास मविआच्या नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम, खा. सुप्रिया सुळे, खा. बाळू धानोरकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, आ. अमर राजूरकर, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर, आ. सुरेश वरपूडकर, आ. संग्राम थोपटे, आ. शिरीष नाईक, आ. प्रकाश सुर्वे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख आदी उपस्थित होते.(Rajni Patil)
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.