कल्याण- शीळफाटा रस्ता कायमच चर्चेत असलेला विषय आहे. या रोडवरून बरेच लोक वाहनांनी ये-जा करत असतात. याच कल्याण- शीळफाटा (Kalyan-Shilphata Rd) रोडवरील काटई टोलनाका कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी आता मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी हे पत्र ट्विटरवरही पोस्ट केले आहे. राजू पाटील यांनी यासंदर्भातील पत्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (Minister of State for Public Works) संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांना दिले आहे. कल्याण-शिळ (Kalyan-Shilphata Rd) हा रस्ता ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांकरिता खूप महत्त्वाचा रस्ता आहे. गेली बरीच वर्षे या रस्त्यावर मौजे काटई येथे टोल (Toll Naka) आकारणी सुरू होती, मात्र सध्या MSRDC कडून या २१ कि.मी. रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरू असून, या रस्त्याकरिता १९८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे टोल आकारणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
मनसे आमदार राजू पाटील यांची ही मागणी
मौजे काटई येथील टोलनाका आता कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी होत आहे, कारण १९८ कोटी रुपयांच्या रस्त्याकरिता प्रवाशांना भविष्यात टोलचा भुर्दंड लावणे अयोग्य आहे. महाराष्ट्रामध्ये आधीच अनेक ठिकाणी टोलनाके सुरू आहेत. त्यातच आता अशा प्रकारच्या कमी खर्चाच्या रस्त्यावर टोल (Toll) आकारणी करणे योग्य नव्हे. त्यामुळे कल्याण-शिळ रस्त्याकरिता मंजूर असलेल्या निधीची शासनामार्फत पूर्तता करून कायमस्वरूपी टोल बंद करावा, अशी मागणी पाटील यांनी या पत्राद्वारे केली आहे.
ठेकेदारांनी खरंच कामे बंद केली तर…
ठाणे महापालिकेची (Thane Municipal Corporation) आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे बिले स्वीकारणेच ठाणे महापालिकेने बंद केले आहे. शहरामध्ये ठेकेदारांच्या (Contractors) माध्यमातून बरीच महत्त्वाची कामे सुरू असून, केलेल्या कामांची बिलेच मिळत नसल्यामुळे कामगारांना पगार देण्याकरिता पैसे नसल्यामुळे काम करणेसुद्धा फार कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच बिले निघत नसल्यामुळे ठेकेदारांनी (Contractors) पालिका मुख्यालयात आंदोलन केले होते, परंतु अद्यापही बिल अदा न झाल्यामुळे आज पुन्हा ठेकेदारांनी (Contractors) आंदोलन करून काम बंद करण्याचा इशाराही दिला आहे. या काळात ठेकेदारांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी (Sandeep Malvi) यांची भेट घेतली असून, माळवी यांनी आयुक्तांसोबत याबाबत बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन दिले आहे. जर ठेकेदारांनी खरंच कामे बंद केली, तर शहरामधील परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.
कोऱ्या कोपरी पुलाला तडे गेल्यामुळे मनसेची याच पुलावर येऊन जोरदार घोषणाबाजी
ठाण्यातील कोपरीमधील नवीन पुलाला (Kopri Bridge) तडे गेले असून, त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. असे सांगत मनसेने या पुलावर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) व ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे (Ravindra More) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. यापूर्वी मनसे नेत्यांनी या पुलाची पाहणी केली होती. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी देत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलनात महिला आंदोलक जास्त प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. तसेच या पुलाला तडे गेल्याने ठाण्याहून मुंबईला जाणे फार कठिण झाले आहे, कारण या पुलाची अवस्था फारच वाईट आहे. प्रवासी अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास कसा करणार? असा सवाल अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केला आहे. या पुलाच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.