रक्षाबंधन आणि मिठाई या दोन्ही गोष्टींशिवाय रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करणार? पण त्याच त्या बाहेरुन आणलेल्या मिठाई खाण्यापेक्षा घरीच जर एक वेगळी मिठाई तयार केली तर? चला तर मग आपण जाऊन घेऊया कशी आहे ‘खाऊ’ची राखी…
राखीपौर्णिमा अगदी उद्यावर आली आहे. अनेक बहिणी भावासाठी वेगवेगळ्या रंगांच्या, वेगळ्या डिझाइन्सच्या राख्या शोधात असतील. मात्र मुंबईमधील प्रभादेवी येथील शेफ बिंबा नायक यांनी एक भन्नाट कल्पनेची राखी शोधून काढली आहे. एडीबल राखी म्हणजे खाण्योग्य राखी. ही राखी तुम्ही सन साजरा केल्यानंतर खाऊ शकता.

या भन्नाट कल्पनेबद्दल त्यांना विचारले असता,”प्रत्येक गोष्ट खायची असावी असा माझा नेहमीच मानस राहिला आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट निर्माण करत असताना ती खाणायोग्य कशी असेल, याचा विचार असतो. त्यामुळे जी राखी चॉकलेट सारखी लहानमुलांना खाता येईल अशी राखी बनवूया, कचर्यामध्ये न फेकता ती राखी खाता येऊ शकते अस मला वाटलं, अशी प्रतिक्रिया शेफ बिंबा नायक यांनी दिली.
Credits and Copyrights – lokshahinews.com