स्रोत: रत्नागिरी खबरदार
जळगाव : महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपसह अन्य विरोधकांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी बोचरी टीका रक्षा खडसे यांनी केली आहे.
ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. खूप कमी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. सरकारनं शेतकऱ्यांकडे पूर्ण दूर्लक्ष केले आहे. सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.