मुंबई : ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईत सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई पोलिसांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर रॅली, मोर्चांना बंदी घातली आहे. दुसरीकडे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही एमआयएम रॅलीवर ठाम आहे. मुस्लिम आरक्षणासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी 300 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना होणार असल्याची माहिती आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राजकीय पक्षांना मुंबईत रॅली काढण्यास परवानगी नाकारण्यात आलीय. अमरावती, मालेगाव, नांदेडमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
राज्यात नव्या 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील तीन रुग्ण मुंबईत आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे गर्दीचं ठिकाण असलेल्या धारावीत आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.