तालिबानने (Taliban) कब्जा केल्यापासून अफगाणिस्तानातील सगळ्याच गोष्टी झपाट्याने बिघडत चालल्या आहेत. अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने (Afghanistan Cricket Team) गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय कष्टाने क्रिकेट विश्वामध्ये नाव कमावले आहे. टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळवला आहे. आता तालिबानने महिलांना क्रिकेट खेळण्यास मुभा नाकारल्याने त्यांचा टेस्ट खेळण्याचा दर्जा आता रद्द होणार आहे. आता त्यानंतर T-20 वर्ल्ड कपआधी (T-20 World Cup 2021) अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमला सर्वात मोठा धक्का बसला आहे. T-20 वर्ल्ड कपकरिता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांची टीम जाहीर केली. ही टीम जाहीर करताच काही तासांत राशिद खानने (Rashid Khan) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला आहे.
राशिद खानने का दिला राजीनामा?
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम निवडीच्या बैठकीत आपल्याला बोलावले नाही, कॅप्टन म्हणून कोणतेही मत न विचारता टीम जाहीर केली, असाही आरोप करत राशिद खानने तात्काळ कॅप्टन्सीचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन व देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने संघाच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याचा मला पूर्णपणे अधिकार होता. निवड समिती व एसबीने टीम निवडताना माझ मत घेतले नाही. त्यामुळे मी तातडीने अफगाणिस्तानची कॅप्टन्सी सोडत आहे. अफगाणिस्तानमार्फत खेळण्याचा मला कायम अभिमान असेल,’ असेही ट्विट राशिद खानने केले आहे.
या T-20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश
अफगाणिस्ताने T-20 वर्ल्ड कपकरिता निवडलेल्या टीममध्ये सहा बॉल व चार ऑलराऊंडर्सचा समावेश आहे. या टीममध्ये राशिद खान, मोहम्मद नबी, हजरतुल्लाह जजाई, मुजीब उर रहमान, मोहम्मद शहजाद, नवीन उल हक व कायस अहमद या T-20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या संघामध्ये २ जणांना राखीव म्हणून निवडण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघामध्ये राशिद खान, हजरतुल्लाह जजाई, रहमनुल्लाह गुरबाज, मोहम्मद नबी, उस्मान घानी, असगर अफगाण, हशमतुल्लाह शाहिदी, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, हामिद हसन, गुलबदीन नईब, नवीन उल हक, शपूर जादरान, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान व कायस अहमद यांचा समावेश आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.