Xiaomi आणि Realme या कंपन्यांनी अनेक स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने त्याची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. एकूणच, रेडमी नोट 10 लाँच झाल्यापासून आतापर्यंत या फोनच्या किंमतीत 2000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. या बाबतीत पोको कंपनीदेखील मागे नाही. कंपनीने आपल्या पोको एम 3 या स्मार्टफोनची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. दुसरीकडे, Realme ने आपल्या पाच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे.
Redmi Note 10 च्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटसाठी आता ग्राहकांना 13,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत अजूनही 15,499 रुपये आहे. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Redmi Note 10S च्या बेस व्हर्जनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. पोको M3 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. दुसरीकडे, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह मिड-टियर व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.
दुसऱ्या बाजूला स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपल्या पाच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे, या यादीत Realme C25s, Realme C21, Realme C11, Realme 8 आणि Realme 8 5G या स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीने Realme C21 च्या किंमतीत 300 रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर Realme C25 आणि Realme C25s खरेदी करण्यासाठी आणखी 500 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही Realme 8 आणि Realme 8 5GB खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला यासाठी 1500 रुपये अधिक मोजावे लागतील.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.