स्रोत: रत्नागिरी खबरदार
नाशिक : जीएसटीचा परतावा वेळोवेळी सरकारला दिला जात असून तो मिळेलच. पण केंद्राने इंधन दर पाच रुपयांनी कमी केले की आपोआप सात रुपयांनी दर कमी होतात. तुम्ही तो दहा बारा रुपयांनी कमी करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर केदारनाथ ज्योतिर्लिंग येथे आद्य शंकराचार्य समाधी व मुर्तीचे अनावरण झाले . त्यानिमित्त देशासह राज्यात भाजप नेते तीर्थस्थानी जाऊन या उत्सवात सहभागी झाले. त्यानिमित्त भाजप नेते फडणवीस यांनी रविवारी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी केंद्राकडून जीएसटिचा परतावा दिला जात नसल्याच्या राज्य सरकारच्या आरोपाबाबत विचारले असता ते बोलत होते. ज्यांना जीएसटी बाबत काही समजत नाही ते या मुद्यावर बोलतात हे दुर्देव असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवाय जीएसटी ऐवजी इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी त्यांनी केली.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.