मुंबई : राज्यातील ड्रग्स प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकारण आता अंडरवर्ल्डपर्यंत पोहचलं आहे. मलिकांनी ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले होते. त्यानंतर मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यानुसार फडणवीसांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मलिकांचे १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत जमीन व्यवहार केल्याचे पुरावे समोर आणले. तेव्हा मलिकांनी मी हायट्रोजन बॉम्ब फोडणार असं म्हटलं. नवाब मलिकांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना रियाज भाटी नावाचा उल्लेख केला.
दोन पासपोर्ट बनवणाऱ्याला अटक केलेली असताना २ दिवसांत कसं सोडलं? असा दावा मलिकांनी केला. रियाज भाटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढतो असं म्हटलं. त्यानंतर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रियाज भाटी हा भाजपाशी नव्हे तर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा केला. केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये रियाज भाटीच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हापासून रियाज भाटी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जनरल सचिव म्हणून तो काम करत होता असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रियाज भाटी प्रकरणावरुन नवाब मलिक स्वपक्षालाच अडचणीत आणतायेत का? असा प्रश्न निर्माण होतो.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.