सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या आगामी प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. लवकरच रिंकू ‘२०० हल्ला हो’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या ट्रेलरमध्ये दलित महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करण्यात आले आहे. रिंकू राजगुरुने २०० महिलांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास एकत्र आणले आहे. ‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून यात रिंकूसोबत अमोल पालेकर आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २० ऑगस्ट रोजी झी ५ या अॅपवर प्रदर्शित होणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com