टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने इतिहास घडवला. भारताचा गोल्डन बॉय टोकियो ऑलिम्पिक परतल्यानंतर खूप व्यस्त झाला आहे. टीव्ही, रेडिओ आणि वेगवेगळ्या माध्यमांसाठी तो मुलाखती देत आहे.. प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्काने नीरजची एक मुलाखत घेतली.या दरम्यान, तो ‘रेड एफएम’ या रेडिओ चॅनेलच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाला होता. आरजे मलिष्का आणि तिच्या मैत्रिणींनी नीरजसाठी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ या गाण्यावर डान्स केला.
मलिष्का म्हणाली, जाण्याआधी मला एक जादूची मिठी (जादू की झप्पी) पाहिजे आहे. त्यावर नीरज म्हणाला, धन्यवाद, दूरूनच नमस्कार, असं दुरूनच भेटा. आणि तो पुन्हा हसायला लागला. विविध राज्य सरकारांनी त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. अनेक कंपन्यांनी त्याला आयुष्यभर मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com