मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी (Rupali Thombre in NCP) आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात पक्षाच्या महिला आघाडीला बळ मिळालं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“रुपालीताई धडाकेबाज आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळेच त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा आमच्या पक्षाला १०० टक्के फायदा होईल यात शंका नाही. पुणे भागात त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचं नाव लौकिक आहे. आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला असला तरी येत्या काळात पक्षाकडून आणखी मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे”, असं सूतोवाच अजित पवार यांनी यावेळी केलं आहे. (Rupali Thombre in NCP)
मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी पाटील, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रुपाली पाटील यांच्यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.