मालवण : देशातील ३ लाख ग्रामीण डाक सेवकांना जानेवारी २०२० पासूनचा महागाई भत्त्याचा १८ महिन्यांचा फरक मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या १८ महिन्यांचा महागाई भत्ता ग्रामीण डाकसेवकांना द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना सिंधुदर्गचे माजी अध्यक्ष अभिमन्य धरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. कोरोना महामारीच्या गेल्या १९ महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण डाक सेवकांनी जीव धोक्यात घालून भारतीय टपाल खात्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. या कर्मचाऱ्याना जुलै २०२१ च्या पगारात महागाई भत्ता केंद्र सरकारने वाढवून दिला. पण, महागाई भत्त्याचा मागील १८ महिन्यांचा फरक मिळालेला नाही. महागाई भत्ता मिळेल या आशेवर ग्रामीण डाक सेवक असून या प्रश्नी खासदार, आमदार यांनी लक्ष घालून ग्रामीण डाक सेवकावर झालेला अन्याय दूर करावा, असे अभिमन्यू धुरी यांनी म्हटलं आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com