मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीन वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या मुलाचं जात प्रमाणपत्र मुस्लीम जातीचं नसल्याचं म्हटलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून माझ्या मुलाला बदनाम करण्याची मालिका सुरु झालेली आहे. नवाब मलिकांना नक्की काय म्हणायचं आहे. त्यांच्या मनात काय हे समजत नाही. जातीचं प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे. नवाब मलिक मंत्री असून आकसापोटी किंवा जावयांना अटक केल्यामुळं असं करतायत का?, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचं दाखवलेलं जन्म प्रमाणपत्र खोटं आहे. नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे यांना विचारून मी कोर्टात जाणार असल्याचा इशारा ज्ञानदेव वानखेडे यांनी दिला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.