◼️ ‘सोमय्यांवरील कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नव्हे, गृहमंत्रालयाची‘
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काडीचाही संबंध नाही. ही कारवाई गृहमंत्रालयाने केली आहे, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी एकप्रकारे सोमय्यांवरील कारवाईचं खापर राष्ट्रवादीवर फोडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत किरीट सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नसल्याचं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. कालपासून जे काही घडतंय किंवा घडवलं जातंय त्यामागे केंद्र सरकार आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, केंद्राच्या पाठबळावर राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा विरोधी पक्षांचा उपक्रम आहे. त्याला धंदा म्हणणार नाही, असं सांगतानाच आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली आहे. ती गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्यात आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करू नये. मी सकाळी पूर्ण माहिती घेतली. गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दोन्ही बाजूने काही प्रश्न निर्माण होतील असं वाटलं म्हणून ही कारवाई झाली. त्यात मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली म्हणून त्याकडे पाहू नये. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी अशा प्रकारचे खोटेनाटे आरोप केले, बुडबुडे सोडले म्हणून आमच्या सरकारला भोकं पडत नाही हे आम्हाला माहीत आहे, असं राऊत म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.