मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांनी तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांनी त्याबाबतचे ट्वीट केले असून त्यांनी पंतप्रधान कार्यालयालाही त्यात नमूद केले आहे. मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात आघाडीच उघडली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करताना म्हटले की, किरीट सोमय्या तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे द्याल अशी अपेक्षा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
◼️ संजय राऊत यांनी विचारलेले प्रश्न
1. पालघरमधील वेवूर येथील नीरव डेव्हलपर्समध्ये 260 कोटी रुपयांची कोणी गुंतवणूक केली आहे?
2. निकॉन ग्रीनव्हिले या प्रकल्पात नील सोमय्या आणि मेधा सोमय्या संचालक आहेत का?
3. ईडीच्या कोणत्या सहसंचालकाने या प्रकल्पात बेनामी गुंतवणूक केली आहे.