
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी एक ट्विट करत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाल्यासंदर्भात माहिती दिली आहे. राजधानी नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नेते मंडळींच्या गाठीभेटींचा कार्यक्रम जोरात सुरु आहे. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊतांची भेट घेतली. संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी यांनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत यांची वैयक्तिक भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांच्या भेटीबाबतची माहिती अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून दिली असून, संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या नक्कीच लाभ होईल, असे म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली. त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते. महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल, असे अमोल कोल्हे यांनी या भेटीनंतर म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणतीही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली, तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे. परंतु, सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल, हे माहिती नाही. मात्र, तीही महत्त्वाची असेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com