आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा,आणि आपल्या लुक्सने तरुणींना घायाळ करणारा अभिनेता संतोष जुवेकरने आपल्या चाहत्यांना फ्रेंडशिपडे चं एक अनोख गिफ्ट दिलंय.संतोषने आपल्या सोशल मीडीयावरून या गिफ्टबद्दल माहिती दिली आहे .लवकरच संतोष जुवेकरच अल्बम सॉंग प्रदर्शित होणार आहे.
“कधी तू असतेस” असं या गाण्याचं नाव असून लवकरच ते प्रदर्शित होणार असल्याची घोषणा संतोषने केली आहे.संगीतकार दिग्विजय जोशी यांनी या गाण्याला संगीत दिलं असून गीतकार मंदार चोळकर यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांनी “कधी तू असतेस” या गाण्याला स्वर दिले आहेत.लवकरच हे गाणं प्रदर्शित होईल अशी घोषणा संतोषने केली आहे.
संतोष त्याच्या अभिनयामुळे कायम चर्चेत राहिला आहे. नुकताच त्याचा ‘भोसले’ सिनेमा आला होता. तेव्हा संतोषने हिंदी चित्रपटसृष्टीतही छाप सोडली. हिंदीतील प्रसिद्ध आणि आघाडीचे अभिनेते मनोज वाजपेयी संतोषने यांच्यासोबत काम केले होते.लवकरच तो “कधी तू असतेस” हे गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com