संपूर्ण जग अगदी शांत राहून बघत राहिले अन् अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या हाती गेले. १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतामध्ये स्वातंत्र्याचा जल्लोष चालू होता, तेव्हा तालिबानचे सैनिक काबुल ताब्यामध्ये घेत होते. अफगाणिस्तानमध्ये सध्या अतिशय तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर क्रिकेटर राशिद खानने चिंता व्यक्त केली. राशिद त्याच्या कुटुंबाला देशाबाहेर काढण्यास सक्षम नाही, असे इंग्लंडचा माजी कॅप्टन केविन पीटरसन म्हणाला आहे. एएनआयच्या वृत्ताप्रमाणे, सध्या काबुल येथील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. राशिद यावेळी युकेमध्ये असून, जिथे द हंड्रेड लीगमध्ये ट्रेंट रॉकेट्स यांच्यामार्फत तो सध्या खेळत आहे.
अफगाणिस्तानातील लोकांना वाचवा, आम्हाला शांतता हवी
काही दिवसांआधी राशिदने अफगाणिस्तानमध्ये वाढणाऱ्या तालिबान कृत्याला बघून ट्विटरद्वारे जगभरामधील नेत्यांना अफगाणिस्तानमधील लोकांना वाचवण्याकरिता आवाहन केले होते. प्रसिद्ध मिस्ट्री स्पिनर्समध्ये ओळख असलेल्या राशिद खानने ट्विट करत पोस्ट केले की, जगभरामधील प्रिय नेते, आमचा देश संकटामध्ये आहे. दररोज महिला व मुलांसह हजारोंच्या संख्येने लोक मारले जात आहेत. घरे व संपत्तीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लोक त्यांचे घर सोडून पळण्याकरिता मजबूर आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला एकटं सोडू नका. अफगाणिस्तानातील लोकांना वाचवा, आम्हाला शांती हवी असेही त्याने सांगितले.
अफगाणिस्तानात एक कट्टर दहशतवादी संघटना तालिबानचा उदय
२००१ सालापासून तालिबान अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तानसोबत लढाई करतो. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदयही अमेरिकेच्या प्रभावामुळे झाला. आता तालिबान अमेरिकेकरिता मोठी डोकेदुखी बनला आहे. १९८० च्या दशकामध्ये जेव्हा सोव्हियत संघाने अफगाणिस्तानात फौज उतरवली होती. तेव्हा अमेरिकेने स्थानिक मुजाहिद्दीनला हत्यारे व ट्रेनिंग देऊन प्रोत्साहन दिले होते. तर सोव्हियत संघाने चक्क हार पत्करली, पण अफगाणिस्तानात एक कट्टर दहशतवादी संघटना तालिबानचा उदय झाला. सोव्हिएत संघाच्या फौजा अफगाणिस्तानातून माघारी गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमधील कंदहार शहराला आपले पहिले केंद्र बनवले. तालिबानने तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे अफगाणिस्तानात कधीकाळी सोव्हिएत संघाच्या फौजाही होत्या. याविरोधात लढणाऱ्या कट्टरतावाद्यांचा कंमाडर मुल्ला मोहम्मद उमर याने पुढे तालिबानची स्थापना केली.
Credits and. Copyrights – Maay Marathi News.