मुंबई : आपल्या दैवी आवाजाने अख्ख्या देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदी अर्थात लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. 25 हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या लतादीदी म्हणजे भारताला लाभलेलं अनमोल सूररत्न आहे. सन 1942 साली ‘किती हसाल’ या मराठी सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं आणि पुढे त्यांच्या जादुई आवाजानं जगभरातील संगीतप्रेमींना वेड लावलं. आज लतादिदीचा 92 वा वाढदिवस आहे. त्यामुळे, देशभरातील दिग्गजांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही लतादीदींना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंनी स्वातंत्र्यपूर्व काळातील काही आठवणी जागवत लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड कलाकारांपासून ते देशाचे गृहमंत्री अमित शहांपर्यंत अनेक दिग्गजांनी लता दीदींना वाढदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, ‘भारतीय गानकोकीळा’ लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे. सन 1942 मध्ये जेव्हा अवघा भारत ब्रिटीशांना उद्देशून भारत छोडोचा नारा देत होता. तेव्हा, एका 13 वर्षांच्या मुलीने भारतीय सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केलं.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.