फोनमध्ये प्रसिध्द असणाऱ्या आयफोन कंपनीच्या Iphone 13 चे नवीन फीचर्स सर्वांसमोर आले आहेत. आयफोनमध्ये कंपनी 5G तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे टाकणार आहे. आयफोन 13 मध्ये नवीन सेल्युलर रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विश्लेषक मिंग ची कू के यांच्या मते, आयफोन 13 लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच LEO सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचरसह येऊ शकतो, जे फोन नेटवर्क नसतानाही आपल्याला कॉल करण्यास आणि एसएमएस पाठविण्यात मदत
कु म्हणाले की, LEO तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आयफोनमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे सेल्युलर कनेक्टिव्हिटी अपग्रेड असणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमचे डिव्हाइस सॅटेलाइट आधारित कम्युनिकेशन क्रिएट करेल. तुमचे डिव्हाइस 4G किंवा 5G नेटवर्क रेंजच्या बाहेर असतानाही हे शक्य होईल. 2019 मध्ये ब्लूमबर्गने पहिल्यांदा अहवाल दिला होता की, Apple लवकरच आयफोनमध्ये LEO उपग्रह सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड वापरणार आहे.
iPhone 13 घ्यायचाय? खिसा हलका करण्याची तयारी ठेवा
आयफोनच्या किंमतीवरुन मिमर्स आधीच किडनी विकण्याचे मिम्स बनवत असतात. गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 12 प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 19 हजार रुपये इतकी आहे. आता आयफोन 13 लाँच होण्याच्या मार्गावर आहे. हा फोन आयफोन 12 पेक्षाही महाग असणार आहे.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.