मुंबई : मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. मात्र आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढण्यात आला आहे. विविध आरोपांनंतर वानखेडेंकडून हा तपास काढण्यात आला आहे. तसेच राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही तपास काढून घेण्यात आला आहे. आता या प्रकरणांचा तपास वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहेत. यानंतर समीर वानखेडे, एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. याचसंदर्भात आता वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने देखील ट्विटर पोस्ट शेअर केली आहे. ‘चुकीच्या माहितीला बळी पडू नका, समीर यांना हटवण्यात आलेलं नाही’, असं म्हणत एनसीबीने जारी केलेलं पत्रकच ट्विटरवरुन क्रांतीने शेअर केले आहे.
एनसीबीने पत्रात काय म्हटलयं ?
‘ एनसीबी डायरेक्टरंच्या निर्देशानुसार एक एसआयटी कमिटी गठन केली आहे. जी मुंबई एनसीबीची सहा केसेस टेकओव्हर करेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लिंकचा यात चौकशी केली जाणार आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला पोस्टवरुन हटवण्यात आलेलं नाही. ते या ऑपरेशन ब्रांचला असिस्ट करत राहणार आहे. एनसीबी केंद्रीय पथक आहे, जो एकत्र मिळून देशभरातील केसेसचा तपास करते.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.