सोलापूर/प्रतिनिधी – कोरोनाच्या भयावह परिस्थितीत कित्येक जणांचे जीव ऑक्सिजन अभावी जात असताना त्यातच माझा लहानपणी पासूनचा मित्र असलेल्या मित्राच्या आईला कोरोनाची लागण होऊन केवळ ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गेला.ज्या व्यक्तीला लहानपणा पासून बघतोय त्यांचा असा जीव जाणे माझ्या खूप जिव्हारी लागले , त्यामुळे ऑक्सिजन विषयी काही समाज प्रबोधन करणे हेच मनात येत होते.त्यानुसार ऑक्सिजन या शॉर्ट फिल्मची निर्मिती करून प्रदर्शित केला.असे फिल्मचे दिग्दर्शक प्रदीप माने यांनी सांगितले.या चित्रपटाचे चित्रीकरण माने यांचे गाव असलेल्या उळे ता.दक्षिण सोलापूर येथे झाले असून 20 मे रोजी पुणे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे.
प्रदीप माने गेल्या चार वर्षांपासून शॉर्ट फिल्म बनवत असून त्यातून अनेक सामजिक संदेश दिले आहेत.त्यामध्ये SMALL MISTAKE , सच्चा देशभक्त , तायडे , हेल्मेट याना अशा शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत.या फिल्मची पुणे ,औरंगाबाद , ठाणे , दिल्ली येथिल स्पर्धेमध्ये निवड झाली होती.कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू ऑक्सिजन अभावी होत असल्याने त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी ऑक्सिजन शॉर्ट फिल्म बनवण्याचे ठरवले.त्यानुसार कथा लिहिण्यास सुरुवात केली व ऑक्सिजन शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण पूर्ण करून युट्युबवर प्रदर्शित केली.20 मे रोजी पुणे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे.
या लघुपटा मध्ये ज्ञानेश्वर शिंदे ( कर्णबधिर ), प्रसाद डांगे , सायबा मोरे , अक्षय मुतेलु यांनी भूमिका केल्या आहेत.या शॉर्ट फिल्मचे निर्माते विशाल जगदाळे,ओंकार पाटील असून कॅमेरा मॅन म्हणून अजय घाटे, नमन जाधव यांनी काम पाहिले आहे. शॉर्ट फिल्मच्या चित्रिकारणा साठी सोलापूर जिल्हापरिषदचे अभियंता राजेश जगताप यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे असे माने यांनी सांगितले.
शॉट फिल्मचे चित्रीकरण पूर्ण होताच त्याचे युट्युबवर प्रसारण करण्यात आले.ऑक्सिजन शॉर्ट फिल्म विविध देश-विदेश पातळीवरच्या विविध चित्रपट स्पर्धामध्ये पाठवण्यात आला.तसेच आणखी बऱ्याच स्पर्धेमध्ये या लघुपटाची निवड होईल असा विश्वास माने यांना आहे.