केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांकरिता तीस हजार सहाशे कोटींची घोषणा केली. त्याचे सकारात्मक पडसाद मुंबई शेअर बाजारात (Mumbai Stock Exchange) दिसून आले. सेन्सेक्सने नव्या विक्रमाच्या दिशेने झेप घेतली आहे. आज मुंबई शेअर बाजार उघडला, त्यावेळी सेन्सेक्सने तब्बल ३५६.९५ अंकांनी उसळी घेत आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला. एकीकडे सेन्सेक्सने ५९ हजार ४९८.११ अंकांपर्यंत झेप घेतलेली असताना निफ्टीनेही १७,७३२.७० अंकांची विक्रमी नोंद केली आहे. शेअर बाजाराच्या (share market) या उसळीमध्ये बँकिंग क्षेत्रामधील शेअर्सने केलेल्या उत्तम कामगिरीचा मोठा वाटा दिसून आला.
बाजार उघडल्यानंतर जोरदार उसळी
आजच्या कामगिरीमध्ये ब्लू-चिप एनएसई (Blue-chip NSE) निफ्टी५० ने ०.५२% वाढ नोंदवत सतरा हजार सातशे एकवीस इतक्या विक्रमी उच्चांकाची नोंद केली. यापूर्वी निफ्टीची सर्वोत्तम कामगिरी १७,७४१.०५ एवढी होती. बजाज फायनान्स (Bajaj Finance), टायटन (Titan) आणि आयटीसी (ITC) यांच्या शेअर्सने आज सकाळी बाजार उघडल्यानंतर जोरदार उसळी घेतल्याचे दिसून आले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ही महत्त्वपूर्ण घोषणा
यंदाच्या अर्थसंकल्पामधून प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या’ (National Asset Reconstruction Company Limited) स्थापनेकरिता तीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या सरकारी हमीच्या तरतुदीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी गुरुवारी केली. यामधून देशातील बँकांकडे तुंबत गेलेल्या बुडीत कर्ज मालमत्ता ताब्यात घेणाऱ्या ‘बॅड बँके’ची वाट खुली होणार आहे. पुढील ५ वर्षांमध्ये वसुली पूर्ण थकलेल्या बँकांच्या एकूण २ लाख कोटी रुपयांची कर्ज मालमत्ता ‘बॅड बँके’कडून ताब्यात घेतली जाऊन बँकांवरील भार हलका केला जाणार आहे, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. नवस्थापित ‘NRCL’ला दिली गेलेली सार्वभौम हमी ही ५ वर्षे कालावधीकरिता असून, या कंपनीला त्या बदल्यात शुल्क भरावे लागेल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. बँकांमार्फत त्यांच्या अनुत्पादित आणि बुडीत मालमत्ता संपादित करताना, त्या बदल्यात ‘NRCL’ला रोख मोबदला व रोख्यांकडून सरकारची हमी द्यावी लागणार आहे. या रोख्यांच्या मूल्यात घसरण झाल्यास त्याची भरपाई करण्याकरिता ‘NRCL’ला ही सार्वभौम हमी दिली गेली आहे. त्याचा परिणाम आजच्या शेअर मार्केटमधील उसळीवर दिसून आला.
The post sensex : सेन्सेक्सची नव्या विक्रमाच्या दिशेने झेप, संपूर्ण जगाचे भारतीय बाजाराकडे लक्ष appeared first on माय मराठी – Maay Marathi News.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.