अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. या अटकेचा मोठा फटका शिल्पाला बसला होता. राजच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्या ही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ हा शो पण सोडावा लागला होता.आता मात्र शिल्पा सुपर डान्सर चॅप्टर ४ च्या सेट वर परत आली असून शिल्पाने पुन्हा चित्रीकरण सुरू केले आहे.
शिल्पा शेट्टी २०१६ पासून ‘सुपर डान्सर’या शोची परीक्षक आहे. त्यामुळे या शोचे निर्माते शिल्पाची वाट बघत होते. पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा शोमध्ये परत येण्याचा निर्णय खूप धाडसाचा आहे. निर्माते खुश आहेत की शिल्पाने शूट सुरू केलं आहे आणि पुन्हा त्यांना तिची रिप्लेसमेंट शोधावी लागणार नाही. काही दिवसांपूर्वी शिल्पाने एक पोस्ट शेअर करत तिच्या खासगी आयुष्याची चर्चा करू नका अशी विनंतीच लोकांना केली होती.
हिना खानने तिच्या इन्स्टाग्रामवर शिल्पा शेट्टीच्या परत येण्याच्या निर्णयाचे कौतुक करत एक स्टोरी पोस्ट केली होती. यात तिने शिल्पाला शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com