अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा सध्या अश्लील व्हिडीओ प्रकरण चांगलेच तापले आहे. राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून त्याचा जामीन अर्जही कोर्टानं फेटाळला होता. या प्रकरणामुळे शिल्पालाही खूप ताण सहन करावा लागत आहे. अशातच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि पती राज कुंद्रा या दोघांच्याही विरोधात माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. शिल्पानं माध्यमांवर खोट्या बातम्या करण्याच्या आणि आपली प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला आहे. शिल्पानं 29 माध्यमांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात काही पत्रकारांचाही समावेश आहे.
ज्या माध्यमांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे त्या माध्यमांनी माफी मागावी आणि 25 कोटींची भरपाई द्यावी, अशी मागणी शिल्पानं केली आहे. त्यामुळे याप्रकरणी काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com