उद्योजक राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.त्यानंतर त्या प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही चौकशी झाली,दरम्यान शिल्पाला या संपूर्ण प्रकरणाची माहीती होती, अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या.त्यांनतर शिल्पाने काही मीडिया ग्रुप्स वर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला.आता तिने तिच्या सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणाचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम होत आहे ते सांगितले आहे.
शिल्पाने तिच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणाली “गेले काही दिवस आमच्यासाठी आव्हानात्म्क होते.अनेक अफवा आणि आरोप केले जात आहेत.माध्यमांनी माझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या.माझ्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आले.मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि मी प्रकरणात व्यक्त होणं टाळत आहे. कारण हे सगळं न्याय प्रविष्ठ आहे, त्यामुळे माझं नाव घेऊन कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका”, असं शिल्पा म्हणाली.
पुढे शिल्पा म्हणाली “या सगळ्या प्रकरणात माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.एक कुटुंब म्हणून,मी तुम्हाला विनंती करते,विशेषत: माझ्या मुलांसाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. पुढे तिने काही मीडिया ग्रुप्स ला विनंती केली आहे की “कोणतीही बातमी पूर्ण माहित नसेल तर त्यावर टिप्पणी करू नका”.
पुढे शिल्पा सगळ्यांना विनंती करत म्हणाली, ‘सगळ्यात महत्वाचं, मी सगळ्यांना विनंती करते की माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीच्या अधिकारांचा या वेळी आदर करा. आम्ही मीडिया ट्रायचे पात्र नाही. सत्यमेव जयते!’
Credits and Copyrights – lokshahinews.com