किरीट सोमय्या हे घोटाळ्या प्रकरणी पाहणी करण्यासाठी वाशिम दौऱ्यावर आले होते. ते देगाव येथे जात असताना शिवसैनिकांनी त्यांचया वाहनावर शाई फेकली. तसेच दगडफेकही करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करण्यात आला. राज्यात सत्तेवर असलेले ठाकरे सरकार हे डाकू सरकार असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शाईफेक आणि दगडफेक करणारे शिवसैनिक हे खासदार भावना गवळी यांचे समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे.
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या एका पत्रामुळे शिवसेना खासदार भावना गवळी ह्या अडचणीत आल्या होत्या. शिवसैनिकांनी आणलेल्या अडथळ्यांमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे अडल्याचा आरोप गडकरी यांनी केला होता. दरम्यान, भावना गवळी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तसेच जिल्ह्यातील महामार्गाची ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.